फ्रान्स : भारताचा लियांडर पेस व अमेरिकेचा स्कॉट लिपस्काय यांनी फ्रान्सच्या लॉरेन्ट लोकोली व मॅक्झिम जेवियर यांचा पराभव करून बोरडॉ चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पेस-स्कॉट जोडीने लोकोली-झेवियर यांच्यावर 6-4, 6-4 अशी मात केली. उपांत्य फेरीत त्यांची लढत भारताच्याच पुरव राजा व दिविज शरण या जोडीशी होणार आहे. राजा-शरण यांनी ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स बोल्ट व थानासी कोकिनाकिस या जोडीला 6-2, 6-7 (4-7), 10-6 असा धक्का देत आगेकूच केली.