पैठण कारागृहातील रजेवरील पसार बंद्यास अटक

Accused on promissory leave in Jalgaon Crime Branch जळगाव : कोरोना काळात अभिवचन रजेवर बाहेर पडतच पसार झालेल्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली. शेख इसा शेख पीरन (40, रा.शिवाजी नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या बंदी कैद्याचे नाव आहे. खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शेख इसा शेख पीरन हा पैठण जिल्हा मध्यवर्ती कारागृह बंदी असताना रजेवर बाहेर पडला मात्र कालावधी संपूनही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेख इसा शेख पिरन यास कोविड कालावधीत आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. या कालावधीत त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याने जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावली नाही अथवा ठरलेल्या तारखेला पैठण कारागृहात हजर देखील झाला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. होता.

शिवाजी नगरात होते वास्तव्य
फरार शिक्षा बंदी कैदी शेख इसा शेख पिरन हा आपली ओळख लपवून जळगावच्या शिवाजी नगर परीसरात ट्रान्सपोर्ट नगरात गाड्यांवर काम करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. हवालदार जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, विजय पाटील आदींच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.