पैशांच्या वादातून हल्ला; चौघांना कोठडी

0

एमआयडीसी पोलिसांकडून अटक


जळगांव: पैसे उशिरा देण्याच्या कारणावरून तांबापुरातील आठ ते नऊ जणांनी तिघांसह तरुणीवर चॉपर तसेच लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी 27 रोजी रात्री घडली होती. गुन्हा दाखल झाल्यावर अरबाज खाटीक याला अटक झाली होती तर इतर सर्व संशयीत फरार होते. त्यापैकी चार संशयीतांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांची 10 पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मास्टर कॉलनीतील रहिवासी अक्रम इस्माईल खाटीक याचा कॅटरिंग’साठी मजूर पुरविण्याचा व्यवसाय आहे. बंगळूर येथे कामासाठी गेलेल्या तरुणांनी पैशांसाठी तगादा लावल्याने ठेकेदार अक्रम हा अशरफ शेख शकील, फैजान अय्युबखान यांच्यासह मजुरीचे पैसे देण्यासाठी 27 जानेवारीला तांबापुरा भागातील बिलाल चौकात आला असताना, अरबाज सईद खाटीक याच्यासह इतर संशयीतांनी ब्लेड, चॉपर व लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवल्याने या घटनेत शाहीन खाटीक (वय 36 रा. बिलाल चौक, तांबापुरा), अकरम इस्माईल खाटीक (वय 23), शेख अशरफ शेख शकील (वय 22), फैजानखान अय्युबखान (वय 21, तिघे रा. मास्टर कॉलनी) असे पाच जण जखमी झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पिोलसांनी अकरम खाटीक याला अटक केल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मात्र पळ काढला होता. फरार संशयीतांपैकी आज पोलिसांनी जुनेद शेख यूनूस (21), जाफर खान इकबाल खान (23), रिजवान खान ऊर्फ बाबा अहमद खान (20), मोहम्मद शोएब ऊर्फ रफत शेख सलीम (19) सर्व रा. तांबापुरा अशांना पेलिसांनी अटक केली.