चिंचवड : पैशाच्या व्यवहारावरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शंकर पवार (वय 34, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ), कारके (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून 7 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार यांचे मालक दीपक कुमार गुप्ता यांचे शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, चिंचवड येथून अपहरण केले. जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत कोठेही जाऊ देणार नाही, असे सांगून गुप्ता यांना डांबून ठेवले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.