धुळे । माहेरून पतीच्या व्यवसायासाठी पैसे आणावे यासाठी महिलेला सासरच्यांकडून मारहाण करून हाकलून लावण्यात आल्याने सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री रोड यशवंत कॉलनी येथील कविता रविंद्र बोरसे (वय 24) या विवाहीतेस पतीला व्यवसाय करण्यासाठी माहेरून 50 हजार रूपये आणण्यासाठी सासरच्यांकडून शिवीगाळ करण्यात येत होती.
तिच्या अंगावरील दागिने काढून तीला माहेरी पाठविण्यात आले. कविताच्या फिर्यादीवरून पती रविंद्र रतीलाल बोरसे, सासरे रतीलाल गंभीर बोरसे, सासु लताबाई रतिलाल बोरसे यांच्या विरोधात 498 (अ), 406, 504, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.