भोसरी : पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एकाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 4) सकाळी एमआयडीसी भोसरीतील लिंबू सरबत चौक येथे घडली. राजेश्वर विठ्ठलराव पाच्छाळ (वय 33, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश सोनला पवार (वय 35, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाच्छाळ रविवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना आरोपी पवार याने त्यांना आवाज देऊन बोलावले. यावेळी त्यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वाद सुरु झाला. या वादातूनच आरोपी पवार याने पाच्छाळ यांना हाताने तसेच दगडाने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.