जळगाव– येत्या गुरूवारी सकाळी ११ वाजता पर्ल, मैत्रेया येथे पैसे अडकेलेल्या ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे़ हा मेळावा शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात होणार आहे़ यावेळी ठेवीदारांना राज्य बँक एम्पलॉईज असोसिएशनचे नेते कॉ़ विश्वास उटगी हे मार्गदर्शन करणार आहेत़ त्यामुळे ठेवीदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन ठेवीदार बचाव समितीचे अध्यक्ष प्रा़ नारायण कटेकर, कॉ़ अमृतराव महाजन, कॉ़ ज्ञानेश्वर पाटील आदींनी केले आहे़ .