पैसे कमविण्याचा शॉर्टकट अन् शाळेचा शिपाई बनला दुचाकीचोर

0

साथीदारांच्या मदतीने चोरल्या 17 दुचाकी ः शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्यात घेतले ताब्यात

जळगाव– अपघाताच्या घटनेमुळे डाव्या हाताचा गंभीर दुखापत झाली, त्यामुळे ड्युटीवर जावू शकला नाही. या वेळेत कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मित्राच्या संपर्कातून दुचाकी चोरी करुन सहज पैसे कमविण्याचा शॉर्टकट मिळाला. अशा प्रकारे पैशांच्या आमिषातून अपंग शाळेतील शिपाई शिवाजी रामदास राठोड (वय 50 रा. सिव्हील लाईन, वाशिम) हा नोकरी सोडून दुचाकीचोर बनला. साथीदाराच्या मदतीने त्याने एकूण 17 दुचाकी चोरल्या असून यापैकी 6 दुचाकी या जळगावातून चोरल्याचे समोर आले आहे. शहरात ठाण्यात गुन्ह्यात त्यास मंगळवारी शहर ठाण्याच्या पोलिसंनी वाशिम पोलिसांकडून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यातील आली आहे.

वाशिम एलसीबीकडूनजळगावच्या गुन्ह्यात घेतले ताब्यात

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी सुरेश रघुनाथ पाटील वय 54 हे 6 ऑगस्ट 2018 रोजी गोलाणी मार्केेटमध्ये खाजगी कामासाठी आले होते. यादरम्यान त्यांची गोलाण मार्केटमधील हनुमान मंदिराजवळून त्यांची 30 हजार रुपये किमतीची (क्र. एम.एच.19, बी.पी. 4390) ही चोरी झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे हे करीत आहेत. शिरसाळे यांना वाशिम येथे दुचाकीचोरांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरलेल्या 17 पैकी 6 दुचाकी जळगावातून चोरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गणेश शिरसाळे, प्रनेश ठाकूर, निलेश पाटील, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने वाशिम स्थानिक गुन्ह शाखेच्या ताब्यातून दुचाकीचोर शिवाजी राठोड यास ताब्यात घेतले. या संशयित व दुचाकीसह पथक मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाले.

शिपायाची नोकरी सोडून मित्रामुळे दुचाकीचोरीकडे वळला

संशयित शिवाजी राठोड हा वाशिम येथील अपंगांच्या शाळेत शिपाई कामयस्वरुपी या तत्वावर कार्यरत आहे. दीड वर्षापूर्वी त्याचा दुचाकी अपघात झाला. यात त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. शाळेत त्याने वैद्यकीय रजा घेतली. घरी असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा यामुळे उसनवारीने मित्राला पैसे मागितले. मित्राने पैसे देतो, पण दुचाकी चोरी करावी लागेत असे सांगितले. यानंतर राठोड पुन्हा शाळेत हजर झाला च नाही. मित्राच्या साथीने राठोडने दुचाकीचोराचा शॉर्टकट निवडला. राठोड याचा मित्र सराईत गुन्हेगार असून राठोडवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

चोरलेली दुचाकी चालवित जायचे वाशिमला

शिवाजी राठोड याने दोन साथीदाराच्या मदतीने वाशिम, अकोला व जळगाव येथून दुचाकी चोरल्या. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिमच्या गुन्ह्यात त्यांना निष्पन्न करुन दोघांच्या मुसक्या आवळल्या. यात सात दुचाकी जळगावच्या आहेत. राठोडसह त्याचा मित्र दोघे रेल्वेने जळगावात यायचे. यानंतर परिस्थिती मास्टरचाबीच्या सहाय्याने दुचाकी चोरायची. दुचाकी चोरली की थेट वाशिमपर्यंत चालवित न्यायचे. याठिकाणी ओळखतल्या एकाच्या मदतीने ती 15 हजारात विकायची. व त्यातून राठोड त्याचा मित्र व विकण्यासाठी मदत करणार असे तिघे समान पैसे वाटून घ्यायचे. अशा पध्दतीने राठोड याने शहरातून सहा दुचाकी चोरल्या आहेत. त्यात प्रत्येकी 2 रामानंद, जिल्हापेठ व शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीतून चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.