धुळे । तालुक्यातील मुकटी शिवारात शुक्रवार, 27 रोजी रात्री दारु पिण्यास पैसे दिले नाही, याचा राग येवून तिघांनी सालदाराचा कुर्हाडीने वार करुन खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृत सालदार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सालदाराचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पीआय दिवाणसिंग वसावे यांनी रात्रीतून आरोपींचा शोध घेवून तिघांना ताब्यात घेतले आहे.
अशी घडली घटना
पिरू पोपट दावलसे (भिल), राजू पोलत मोरे, महेंद्र माधवराव देवरे (तिघे रा. मुकटी ता.जि.धुळे), यांनी शुक्रवारी रात्री गावातीलच दगडू पुंडलिक मराठे (वय-48) व देवीदास नामदेव पवार (वय-45) यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. दोघांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यानंतर मुकटी गावाचे शिवारात पिंपळकोठा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे खळ्याजवळ पवार यांच्याशी तिघांनी हुज्जतही घातली. यानंतर तिघांचे आणि पवार यांचे जोरदार भांडण झाले. हा वाद मिटवून मराठे आणि पवार हे शेतात झोपण्यासाठी गेले. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने आणि त्यात पुन्हा भांडण झाल्याने तिघांनी पवारचा काटा काढायचे ठरविले. मराठे आणि पवार हे शेतात झोपले असतांनाच पियू भिल, राजू मोरे, महेंद्र देवरे यांनी लोखंडी कुर्हाडीने व काठीने पवार यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. झोपेच्रा अधीन असतांना बेसावधपणे अचानक झालेल्रा रा हल्ल्रामुळे पवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असतांनाच देवरे याने पुन्हा पवार यांच्या डोक्यावर, गळ्यावर कुर्हाडीने वार केले. या हल्ल्यात पवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिघे मारेकरी तेथून पसार झालेत.
तिघे पोलिसांच्या ताब्यात
मराठे यांनी पवार यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून पोलिसांना माहिती कळविली. यानंतर डिवायएसपी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पवार यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घडलेल्या प्रकाराची माहिती मराठे यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपनिरीक्षक कदीर तडवी, उपनिरीक्षक विनोद वसावे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार ओंकार गायकवाड, प्रकाश मोहने, सतिष कोठावदे, गोरख चौधरी, दिनेश मावची, सुनील पगारे यांनी रात्रीतून शोध मोहिम राबवून संशरित आरोपी भिल, मोरे आणि देवरे या तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दगडू मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिूय भिल, राजू मोरे आणि महेंद्र देवरे यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.