पैसे पडल्याचे सांगून सावद्यात लाखाची रोकड धूम स्टाईल लांबवली

सावदा : तुमच्या मागे पैसे पडले आहेत, असे सांगून शेतकर्‍याचे लक्ष विचलित होताच भामट्यांनी धूम स्टाईल लाखाची रोकड लांबवली. सावदा पोलिसा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सावदा पोलिसात गुन्हा दाखल
रावेर तालुक्यातील गौरखेडा येथील रमेश यादव महाजन हे सावदा शहरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर उभे होते. त्यांच्याकडील बॅगेत एक लाखांची रक्कम व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी महाजन यांना तुमच्या मागे पैसे पडले आहे, असे सांगितले. यामुळे महाजन यांचे लक्ष विचलित होताच दोघांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. ही घटना काही क्षणातच घडल्याने महाजन यांनी आरडा-ओरडा केला तोवर चोरटे पळून गेले होते.

सीसीटीव्हीद्वारे भामट्यांचा शोध
याप्रकरणी सावदा पोललस स्थानकात दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहकारी करीत आहेत.