पैसे मागताच गुरे मालकाने मजुराचे डोके फोडले

0

रावेर येथे गुरांच्या बाजारातील घटना

रावेर- मजुराने मजुरी मागितल्याचा राग आल्याने मालकाने मजुराच्या डोक्यात काठी मारून त्यास जखमी केल्याची घटना शुक्रवारी रावेरात घडली. याबाबत तिघा संशयीतांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुलेमान तडवी याने रोजंदारीने अक्रम शेख यांच्या मालकीचे बैल पाल येथून रसलपुरपर्यंत आणले होते. शुक्रवारी कृषी उपन्न बाजार समितीत बैलांच्या बाजारात सुलेमान तडवी याने अक्रम शेख यांच्याकडे मजुरीची मागणी केल्याचा राग आल्याने अक्रमने सुलेमान तडवी याच्या डोक्यात काठी मारून दुखापत केली तर मोती मुसलमान, शेख नाजीने त्याला शिविगाळ केली. याबाबत तिघा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहेत.