पैसे मागितल्याने शेतकर्‍यास मारहाण : व्यापार्‍याविरुद्ध निंभोर्‍यात गुन्हा

निंभोरा : कापूस विक्रीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून व्यापार्‍याने शेतकर्‍यास मारहाण केली. या प्रकरणी निंभोरा पोलिसात व्यापार्‍याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. खिर्डी बु.॥ येथील शेतकरी केतन शांताराम भंगाळे यांचे व्यापारी ईस्माईल सुलेमान पिंजारी यांच्याकडे कापूस विक्री केल्यानंतर वर्षभरापासून पैसे बाकी असल्याने त्यांनी ते मागितले असता ईस्माईल सुलेमान पिंजारी याने केतन शांताराम भंगाळे या शेतकर्‍यास मारहाण केल्याचा आरोप आहे. तपास सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे व एएसआय अन्वर तडवी करीत आहेत.