जळगाव । अमळनेर शहरातील बोहरी पेट्रोलपंपाचे मालक अली अजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी यांची हत्या पैसे लुटीच्या प्रकारातून झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुर्हाडे यांनी दिली. सतरा दिवसानंतर या खूनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात तनवीर शेख मुख्तार शेख सत्तार (वय-23, रा. ख्वॉजानगर, अमळनेर), मुस्तफा शेख मोहम्मद शेख (वय-24, रा. जुना सरकारी दवाखाना मागे, अमळनेर) तसेच तौफिक शेख मुनी (वय-23, रा. गांधलीपूर, दुर्गा अली मोहल्ला अमळनेर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी पेट्रोलपंप मालकाची खून केला असल्याची कबूली दिली आहे. मुख्यसुत्रधार आरोपी कैलास रामकृष्ण नवघरे रा. गांधलीपूरा अमळनेर हा अद्याप फरार असून त्याच्या शोधार्थ एलसीबीचे पथक नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.
अमळनेर येथून अटक
बोहरी यांच्या खूनात तनवीर शेख मुख्तार सत्तार, मुस्तफा शेख मोहम्मद शेख तसेच तौफिक शेख, कैलास नवघरे या चौघांचा हात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यानुसार गेल्या आठवभडाभरापासून हे पथक संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवून होते. अखेर शनिवारी रात्री पथकाने मुस्तफा व तनवीर या दोघांना रातोरात घरातून सापळा रचून अमळनेरातून अटक करत सकाळी चार वाजेच्या सुमारास जळगावात पथक दाखल झाले. यानंतर रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिसरा संशयित तौफिक शेख याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसर्या पथकाने अटक केली.
रस्त्यावरील लाईट केले बंद
चारही आरोपीना चोरी करण्याच्या इराद्याने आले होते. त्यामुळे त्यांनी दारू पिऊन रस्त्यावरील सर्व लाईट बंद केले होते. सोबत दोन तीन दिवसांपासून खिश्यात मिरचीची पुडी घेवून फिरत होते. अंधाराचा फायदा घेत बोहरी यांना लुटण्याचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी चौघांनी बोहरी येण्याआधीच रस्त्यावरील सर्व लाईट बंद केले होत. अशी माहिती तिघांनी पोलीसांच्या चौकशीत दिली.
चार बियर केल्या फस्त
घटनेच्या अर्धा तासापूर्वी चौघांनी उद्यानात बसून मुस्तफा शेखला आरोपी कैलास नवघरे यांने पाचशे रूपये देवून तीन बियर मागविल्या. दारू पिऊन तिघे दारूच्या नशेत तर्रर्र झाले होते. तीन बियरमध्ये त्यांचे समाधान न झाल्याने पुन्हा त्यांनी मुस्तफाला दोनशे रूपये देऊन अजून एक बियर मागून घेतली होती. खूनाच्या पाच मिनीटा अगोदर तिघांनी शेवटची बियर संपविली. तत्पूर्वी बियर घेण्यासाठी मुस्तफा शेख गेला असता दुचाकीत पेट्रोल नसल्यामुळे आरोपी मुस्तफा शेखने बोहरींच्या पेट्रोलपंपावर साडेदहा वाजता पेट्रोल भरले होते.
तिघांनी गुन्ह्याची दिली कबूली
अटक केलेल्या तिन्ही संशयितांनी पेट्रोलपंपमालक बोहरी यांचा खून केल्याची कबूली पोलिसांनी दिली आहे. एवढेच नव्हेत संपूर्ण घटनाक्रम देखील त्यांनी पोलिसांसमोर उलगडला. ज्यावेळी खून झाला त्यावेळी रस्त्यावरील जळगाव पिपल्स बँकेने लावलेल्या बाहेरील बाजूच्या सीसीटीव्हीमध्ये बंदूकीतून गोळी झाडल्याचा आवाज येत होता. त्यावेळी तो रस्त्यावर एकही वाहन जातांना दिसून आले नाही.
कशी झाडली गेली गोळी?
रात्री 11 वाजता बोहरी हे पेट्रोलपंपा आल्यानंतर त्यांनी संपूर्ण पेट्रोलपंपाच हिशोब बॅगेत ठेवून तेरात्री 11.46 वाजता घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत असलेल्या शिवाजी उद्यानाजवळ कैलास, तनवीर, मुस्तफा, तौफिक हे चौघे दबा धरून बसलेले होते. बोहरी हे येत असल्याची खबर नजर ठेऊन बसलेला मुस्तफा याने अन्य साथीदारांना दिली. आणि बोहरी हे दुचाकीने उद्यानाजवळ येताच चौघांनी त्यांना हेरले. व एकाने मिरची पूड त्यांच्या अंगावर फेकली तर दुसर्याने बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्या बोहरी यांना जोर-जोराने आरडा ओरड करण्यास सुरूवात करताच कैलास नवघरे याने चक्क त्याच्या हातातील बंदूकीने त्यांच्यावर गोळी झाडली. अन् तेथून चौघांनी पळ काढला. जखमी अवस्थेत बोहरी हे त्यांच्या पेट्रोलपंपावर परतले. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केेले.
अगोदर तनवीर पेट्रोलपंपावर होता कामाला
खूप प्रकरणात चारही आरोपींपैकी तनवीर शेख मुक्तार शेख काही लहानपणापासून पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याने दीड ते दोन वर्षांपुर्वीच पेट्रोल पंपावर काम सोडले होते. आगोदर पेट्रोल पंपावर काम केल्याने दररोज पैश्याचा मोठ्या प्रमाणावर गल्ला येतो आणि इतर हालचाली चांगल्या पद्धतीने माहित होत्या. त्यामुळे त्यांना चोरी करण्याची कल्पना सुरूवातीला दोन महिन्यापुर्वी 24 फेब्रुवारी 2018 रोजी याच पेट्रोलपंपावर घरफोडी करत 8 लाखांची रक्कम लंपास केली होती.
रूग्णालयाच्या छतावर झोपला!
बोहरी यांना खाजगी रूग्णालयातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करतांना मुस्तफा शेख हा मयत बोहरा यांच्या मृतदेहाजवळ हजर होता. वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले गेले. आरोपी मुस्तफानंतर तर दुसरा मुख्य संशयित कैलास नवघरे तीन बियर दारू पिल्याने हा सामान्य रूग्णालयाच्या इमारतीच्या छतावर दारूच्या नशेत झोपलेला होता. अशी माहिती आरोपी मुस्तफा शेख मुहम्मद याने सांगितली. त्यानंतर सकाळी उठून जसे काही झालेच नाही असे दर्शवून उपजिल्हा रूग्णालयातून काढता पाय घेतला. दरम्यान मयत बोहरा यांची नातेवाईकांची यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
खूनातील चौघा आरोपींच्या विरोधात जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा यांच्यासह जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा, चोपडा आणि पारोळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घरफोडी आणि मारहाणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यांनी केली कामगिरी
पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी डॉ. राजेंद्र होळकर, पोहेकॉ विजय पाटील, शशिकांत पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, नुरूद्दिन शेख, चंद्रकांत पाटील, रविंद्र पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, रामचंद्र बोरसे, सुरज पाटील, दत्तात्रय बडगुजर, सतिष हाळनोर, गुफुर तडवी, पोहेकॉ विनय देसले, इंद्रीस पठाण, दर्शन ठाकणे या पथकाने आरोपींना अटक करण्यास परीश्रम घेतले.
यापूर्वीही बोहरींना आठ लाखास लुटले
गेल्या काही महिन्यांपूर्वी अली अजगर बोहरी हे आठ लाख रूपये घेऊन जात असताना त्यांना या चौघांनीच वाटेत अडवूनक करत आठ लाख रूपयाची लुट केली होती. त्यामुळे त्यांना दररोजचा गल्ला आठ लाखहून अधिक असल्याचे लक्षात ठेवून दुसर्यांदा लुटण्याचा प्रयत्नात खून झाला. तसेच पारोळा, चोपडा, अमळनेर या भागात ज्या काही घरफोड्या व किरकोळ चोर्या या चौघानीच केल्याची कबूली त्यांनी दिली आहे. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या गुन्ह्यात दुचाकी क्र.(एमएच19 सीजी 5659 आणि एमएच 15 ऐवाय9939) आणि कार क्र.(एमएच 04 ईडी 995) ही वाहने देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
चौघा आरोपींविरोधात 24 फेब्रुवारी केलेल्या घरफोडीमुळे अमळनेर शहर पोलीसता भाग 5 गुरनं 47/2018 भादवी 461,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे तर आता खूनाच्या गुन्ह्यात भाग 5 गुरनं 95/2018 नुसार भादंवी 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.