न्यूयॉर्क : पॉर्न फोटो साठविल्याने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय तरुणाला अटक करण्यात आली. अभिजित दास असे संबंधित 28 वर्षीय तरुणाचे नाव असून न्यायालयाने त्याला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तो मूळचा भारतीय रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या तो पिट्सबर्ग येथे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अभिजितने बेकायदेशीरपणे त्याच्या कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये सुमारे एक हजारांहून अधिक बालकांचे पॉर्न फोटो साठविले. तसेच सुमारे 380 व्हिडिओही त्याने त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्याचे समोर आले आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरोधात एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.