पॉलिशच्या बहाण्याने महिलेचे दागिने लंपास

0

पिंपरी-चिंचवड : दागिन्यांना पॉलिश करुन देतो असे सांगून हातचलाखीने एका महिलेचे दागिने चोरट्याने पळवले. ही घटना गुरुवारी (दि.21) दुपारी अडीचच्या सुमारास रहाटणी येथे घडली. रिजवाना शेख (वय 45 रा, रहाटणी) यांनी एका अनोळखी इसमाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दागिने पॉलिश करुन नव्यासारखे करुन देतो असे म्हणून एका अज्ञात इसमाने हातचलाखीने नऊ हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.