पॉलिशच्या बहाण्याने महिलांना गंडवणारा भामटा यावल पोलिसांच्या जाळ्यात

0

यावल- पॉलिशच्या बहाण्याने महिलांना गंडवत त्यांच्याकडील दागिने लांबवणणार्‍या भामट्यास यावल पोलिसांनी अटक केली आहे. शर्वण कुमार (पुर्णिया, बिहार) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील सुतार वाडा भागातील जनाबाई संजय बारी (45) यांच्याकडून आरोपीने जुन्या चांदीच्या दागिन्यांना चमकावण्याच्या नावाखाली हातचलाखी करीत दागिने लांबवले व संशयीत पसार होण्याच्या बेतात असताना महिलेने जागृकता दाखवत परीसरातील तरुणांच्या भामट्यास पकडले. यावेळी जमावाने आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जनाबाई संजय बारी यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या भामट्याने अनेकांना गंडवल्याची शक्यता आहे.