पॉलिशच्या बहाण्याने सोन्याच्या बांगळ्या लंपास

0

कासोदा – सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने एकाने दागिने पळविल्याची घटना येथील शिवाजी नगर भागात घडली.
मंगळवार १८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी ३० ते ३२ वयाचा अज्ञात व्यक्ती देवघरातील देव व चांदीच्या वस्तुंना पॉलिश करून देण्यासाठी परिसरात फिरत होता. यावेळी घराच्या वट्यावर बसलेल्या पार्वताबाई पोपट पाटील (वय-८२) वर्ष यांच्याजवळ येवुन हातातील बांगड्यांची पाॅलिश करुन देतो पार्वताबाई पोपट पाटील यांनी 3 तोळ्याच्या दोन बांगड्या पॉलिश करुन देण्यासाठी काढुन दिला असता त्या व्यक्तीने पळ काढत पोबारा केला. वृध्द महिलेने घरीच असलेल्या आपल्या मुलाला व सुनेला घडलेला प्रकार सांगितला. परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. जयप्रकाश पोपटराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कासोदा पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. असून पुढील तपास सपोनि सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.विजय पाटील हे करित आहे.