मेहरुण परिसरातील घटना ; संशयितास पोलिसांच्या केले स्वाधीन
जळगाव- चांदीचे जोडवे पॉलीश करुन नवीन चकमकित करुन देतो, असे सांगून महिलेचे दोन्ही पायातील जोडवे घेवून पसार होणार्या भामट्यांना नागरिकांनी पकडल्याची घटना 14 रोजी मेहरुण परिसरातील कुंभारवाडा येथे घडली. कैलास साह वय 29 रा. मधेपुर, बिहार असे संशयिताचे नाव असून याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एमआयडीसी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
मेहरुण परिसरातील कुंभारवाडा परिसरात हर्षा राजेंद्र जंजाळकर वय 40 ह्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. 14 रोजी 7.30 वाजेदरम्यान सायंकाळी पती व त्याची मुलगी घरात बसलेले होते. हर्षा या घराबाहेर कपडे धुत होत्या. यावेळी एक व्यक्ती त्याच्याकडे आला व त्याने तुमची भांडी पॉलीश करावयाची आहे काय असे विचारले. हर्षा यांनी त्यास नकार दिला मात्र यानंतरही त्याने पुन्हा सोन्या, चांदीचे दागिणे असे तर द्या मी पॉलीश करुन देतो, असे सांगितले. पुन्हा नकार दिल्यावर भामट्याचे हर्षा यांच्या पायातील जोडव्यांकडे लक्ष गेले. तुमचे जोडवे जुने असून काढून एकदम नवीन चकमकित करुन देतो, असे हर्षा यांना म्हणाला.
आरडाओरड केल्यावर नागरिकांनी पकडले
हर्षा यांना बोलण्यात ठेवून भामट्याने त्याच्या दोन्ही पायातील 20 ग्रॅम किंमतीचे 900 रुपयांचे जोडवे काढून घेत व पळून जावू लागला. हर्षा यांच्या प्रकार लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड केला, यानंतर त्याचे पतीसह आजूबाजूच्या नागरिक जमा झाले व त्यांनी पसार होण्याच्या प्रयत्नातील भामट्यास पकडले. त्याची चौकशी केली असता, कैलास साह वय 29 असे नाव असल्याचे त्याने सांगितले. यानंतर नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करुन प्रकाराची माहिती दिली. त्
संशयितास न्यायालयीन कोठडी
नागरिकांच्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, सचिन पाटील, गोविंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. व कैलास साह यास संशयितास ताब्यात घेतले. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता न्या. अक्षी जैन यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पॉलीश करण्याच्या बहाण्याने गंडा घालणार्यापासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी केले आहे.