पोक्सोतील दोषींना दया याचिकेचा अधिकार नको: राष्ट्रपती

0

नवी दिल्ली: आज हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर पाशवी बलात्कार करून त्याची जाळून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत होते. दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. दरम्यान आजच हैदराबाद पोलिसांनी चारही आरोपींना एन्काऊंटर करून ठार केले. दरम्यान आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी असलेल्या आरोपींना दयेचा अर्ज करता येऊ नये. कायद्यात तशी तरतूद करायला हवी. कायद्यात पोक्सो अंतर्गत दोषी ठरलेल्यांना दयेच्या याचिका करता येऊ नये यासाठी कायदा व्हायला हवे असे मत व्यक्त केले आहे.

निर्भया प्रकरणातील दोषी आरोपीपैकी एका आरोपीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. तो अर्ज राष्ट्रपतींनी रद्द करावा अशी मागणी गृहमंत्रालयाने केली आहे.