शहादा । शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचातींच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेला पोटनिवडणुकीचा निकाल काल सोमवारी घोषीत करण्यात आला. चार मतदान यंत्रातील मतमोजणी तहसील कार्यालयात शांततेत पार पडली असून निवडून आलेल्या उमेदवार व सर्मथकांनी तहसील आवारात जल्लोष केला.शहादा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या 44 जागांसाठी 27 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली.
22 जागांसाठी एकही नामांकन नाही
तत्पुर्वी यातील तब्बल 22 जागासाठी एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. तर 17 मे रोजी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर 17 जागा बिनविरोध झाल्यात तर उर्वरीत पाच जागांसाठी 27 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या पाच जागांची मतमोजणी शहादा तहसिल कार्यालयात एका टेबलवर करण्यात आली. यात पिंपर्डे येथे लोटन दशरथ वाघ 151 मतांनी तर कस्तुरीबाई श्यामराव चौधरी 142 मतांनी निवडून आले. माजी सरपंच जिजाबाई सरदार भील व त्यांचे पती सरदार पदम भील यांना पराभवास सामोरे जावे लागले. दोंदवाडे प्रभाग 1 मध्ये मालुबाई हिम्मत पाटील (84), प्रभाग 3 मध्ये मिनाबाई अमृत पाटील 115 मतांनी विजयी झाल्या. कनसई येथे निर्मलाबाई काशिराम मोरे 152 मते मिळवुन विजयी झाल्या. येथे विद्यमान सत्ताधार्यांचा विरोधात निकाल लागला.
यांचा झाला विजय
या पोटनिवडणुकींसाठी बिनविरोध झालेल्या पोटनिवडणुकीत पळासवाडा येथे शैला बागले, गोटू ठाकरे. फेस येथे पदमाबाई भील. कलसाडी येथे विष्णु सोनवणे, येशिला भिल. औरंगपूर येथे मंगला अशोक. बामखेडा त.त. येथे यशवंत भिल. वडगाव येथे परशराम भिल. कानडी त.त.प्रभाग मध्ये एक मध्ये सुनिता ठाकरे, जगन जामसिंग वळवी, सुशिला सुभाष पाटील. प्रभाग दोन मध्ये काशिबाई ईश्वर मोरे, जसीबाई गण्या पवार, सुकलाल जामसिंग ठाकरे तर प्रभाग तीन मध्ये सुशिला सुभाष पाटील, इजमा रतिलाल नाईक हे तर सार्वत्रिक निवडणूकीत लक्ष्मीबाई चौव्हाण निवडून आले. निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी तहसीलदार मनोज खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार वाय.डी.पाटील, डॉ.उल्हास देवरे, निवडणूक अधिकारी जी.बी.धाकड, एस.जी.वाडेकर, एस.जी.परदेशी, समाधान पाटील, लिपीक किशोर भादरुगे, आनंद महाजन आदिंनी काम पाहीले. कानडी त.ह.येथे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच रश्या ठाकरे, माजीउपसरपंच सुभाष पाटील, तिरूपती महाराज, प्रयत्न केले.