मुंबई: महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पठोपाठ यातही भाजपला धक्का बसला आहे. मानखुर्द, पिंपरी, भुसावळ, नाशिक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. याठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहे. नागपूर महानगरपालिकेतच भाजपचा उमेदवार विजय झाले आहे. मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. महापालिका प्रभाग क्रमांक 141 पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला आहे.