शहादा । येथील प्रभाग क्र 3 ब मधील पोटनिवडणुक वेळी शहादा नगरपरिषद येथे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. तहसीलदार मनोज खैरनार यानी प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रभाग क्र 3 ब मध्ये सद्दाम तेली यांच्या खुन झाल्यानंतर ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीत समोरासमोर दोन उमेदवार असुन एमआयएमतर्फे सद्दाम तेली यांचे बंधु वसीम तेली तर अपक्ष म्हणुन अब्दुल नइम आहेत. या प्रभागात एकुण 2814 मतदार असून त्यांच्या मतदानानुसार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार यांचे भविष्य ठरणार आहे. दरम्यान या 2814 मतदारांमध्ये पुरुष एकुण 1537 तर स्त्री मतदार 1277 आहेत. मतदानासाठी नगरपालिका शाळा क्र.14 येथे एक तर नगरपालिका क्रमांक 15 ला दोन अशी एकुण तीन बुथ आहेत. मुस्लिम बहुल वस्ती असल्याने एका बुथवरमहिला कर्मचारी देण्यात आल्या असुन एका बुथची संख्या सहा कर्मचारी अशी आहे. सवेदनशील केंद्र असल्याने पोलीस बंदोबस्त मोठा असणार असल्याचे तहसिलदार मनोज खैरनार यांनी कळविले आहे.