पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय गायकवाड रिंगणात

0

पुणे । दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्र. 21 मधील पोटनिवडणूकीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय सूर्यकांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, आमदार जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, निरीक्षक कृष्णकांत कुदळे, नगरसेवक सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.

ही लढाई भाजपाच्या विरोधात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात वाढत चाललेल्या अराजकतेमुळे संपुर्ण लोकमानसात असंतुष्टतेची भावना निर्माण होत आहे. लोकांचा कल पाहता सामान्य नागरिकांमध्ये भाजप सरकारविरोधातील आक्रोश अनेक प्रकारे व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे आणि म्हणूनच आम्ही ही पोटनिवडणूक लढवत आहोत, असे वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले.