मुक्ताईनगर। तालुक्यातील 20 ग्रामपंचायती मधील रिक्त असलेल्या 33 जागांसाठी प्रशासनाचे वतीने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. तालुक्यातील चार ग्रामपंचायती वगळता उर्वरीत 16 ठिकाणी नामनिर्देशन पत्र न आल्याने त्या जागा रिक्तच राहणार आहेत. तर चार ग्रामपंचायती पैकी तिघे ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर एक एक नामनिर्देशन पत्र आल्याने ते सदस्य बिनविरोध झालेले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीत अशा झाल्या लढती
कोर्हाळा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक एक मधील अनुसूचित जमाती जागेवर तिघांनी अर्ज भरले होते. 17 मे रोजी अर्ज माघारीचे दिवशी येथे संजय सुखदेव कांडेलकर यांनी माघार घेतल्याने गणेश अभिमन्यू इंगळे व मुकुंदा एकनाथ न्हावकर यांचेत सरळ सरळ लढत झाली. 27 मे रोजी येथे प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले होते. या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोर्हाळा येथील एका जागे करीता निवडणुक होऊन वार्ड क्रमांक 1 मध्ये एकुण दोन उमेदवार होते त्यापैकी गणेश अभिमन्यु इंगळे यांना 83 मते, मुकुंदा एकनाथ न्हावकर 179 मते, नकारात्मक मते 8, एकुण मते 270 यामध्ये मुकुंदा एकनाथ न्हावकर यांनी बाजी मारली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम. फारुकी यांनी काम पाहीले, तर पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त पाळला. बिनविरोध सदस्यांमध्ये राजुरा- वार्ड क्रमांक 1 मधील दोन जागा सुमन शंकर तायडे (नामाप्र), नर्मदा योगेश कांडेलकर (अनुसूचित जमाती), वार्ड क्रमांक 9, 2 मधील दोन जागा सुशिला रमेश कांडेलकर (अनु.जमाती स्री), गणेश रमेश कांडेलकर (अनु.जमाती), वार्ड क्रमांक 3 मधील दोन जागा रघुनाथ सिताराम कांडेलकर (अनु.जमाती) नर्मदा कांडेलकर (अनु.जमाती स्री) खामखेडा- वार्ड क्रमांक 2 मधील एक जागा- वीणा निवृती बेलदार नांदवेल – वार्ड क्रमांक 2 मधील एक जागा – मुरलीधर त्र्यंबक पाटील हे विजयी झाले आहेत.