तळोदा । शेतकर्यांची कर्ज माफी करावी व अन्य मागण्या मंजूर करून महाराष्ट्रात होणार्या शेतकरी आत्महत्या थांबव्यवयात यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पोतराज बनून अंगावर फटके मार आंदोलन आज बळीराजा शेतकरी संघाचे प्रवक्ते विजय जाधव यांनी तळोदा तहसील कार्यालयासमोर केले संपूर्ण कर्ज मुक्ती साठी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन करीत आहे दोन महिन्यांच्या संघर्षात सरकारकडून कुठलीही फलित शेतकर्यांना मिळालेले नाही देशाचा अन्नदाता अनंत संकटांशी झुंज देत आहे प्रसंगी मृत्यूला कवटाळीत आहे आत्महत्या करीत आहे. या शेतकर्यांनाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकर्यांच्या समस्या समाजापुढे मांडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघाचे प्रवक्ते सांगली येथील विजय बाळासो जाधव हे अल्पभूधारक शेतकरी महाराष्ट्रात फिरून त्यांचे कडक लक्ष्मी आंदोलन मागील महिन्या पासून करीत आहेत.
पोतराजच्या वेशभूषेत जनजागृती
राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे होणार्या या आंदोलनात सांगली येथील सहकारी विवेक कदम व स्थानिक शेतकर्यांची साथ घेऊन ते आंदोलन करीत आहेत. त्यांनी आज तळोदा तहसील कार्यालयासमोर आपले आंदोलन केले. यात विजय जाधव हे पोतराजची वेशभूषा धारण करून अंगावर फटके मारून घेत पथनाट्यातून लोक जागृती करतात.
निवेदनावर शेतकर्यांच्या स्वाक्षरी
यानंतर उपस्थित शेतकर्यांच्या व नागरिकांच्या स्वाक्षर्या निवेदनावर घेतात. पथनाट्यासाठी त्यांना विवेक कदम ढोलकी वर साथ देतात. आजसुद्धा त्यांनी उपस्थितांसमोर शेतकर्यांची दारुण अवस्था उभे करणारे पथनाट्य सादर केले. पथनाट्या दरम्यान शेतकर्यांच्या विदारक अवस्थेचे नाट्य सादर करून नंतर उपस्थित असंख्य शेतकर्यांच्या सह्या घेत एक निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आजच्या आंदोलनाच्या वेळी तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते
15 ऑगस्टला आंदोलनाची सांगता
या निवेदनात शेतमालाला हमी भाव द्यावा जून 2017 पर्यन्त शेतकर्यांची कर्ज मुक्ती करावी. सन 2011 पूर्वीची थकीत कर्जाची वसुली थांबवावी शेतकर्यांचे वीज बिल माफ करावे. डॉ स्वामिनाथन आयोग लागू करावा. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 100 टक्के कर्जमाफी द्यावी. महिला सुरक्षेच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करा अश्या मागण्या केल्या आहेत. राज्यभरातल्या शेतकर्यांच्या स्वाक्षर्या असलेल्या निवेदनाची प्रत 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर आंदोलनाच्या सांगता प्रसंगी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहेत.