पोद्दार शाळेजवळ भरधाव इंडिका कारची रिक्षाला धडक; 4 जखमी

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील पोद्दार शाळेजवळ पाळधीकडे जात असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणार्‍या इंडिका कारने जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालकासह तीन प्रवासी व इंडिका कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, चार जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात तर इंडिका कारचालकावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. रिक्षाचालक कृष्णा नन्नवरे (वय-35 रा. पाळधी) हे जळगावातून प्रवासी घेवून पाळधी येेत जात होते. सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास माहामार्गावरील पोदार शाळेजवळ आल्यानंतर धुळ्याहून जळगावकडे येत असलेल्या भरधाव इंडिका कारने रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होवून रिक्षाचालक कृष्णा नन्नवरेसह प्रवासी सुकदेव रूपचंद कोळी (वय-40 रा. चांदसर), ज्योती राहूल कोळी (वय-22 रा.चांदसर) व मिठाराम बारेला (वय-26 रा. सोनवद) हे गंभीर जखमी झाले. तर इंडिका कारचालकही गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत जखमींना लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.