पोरबंदर-सांत्रागाची एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला लूटले

भुसावळ : पोरबंदर-सांत्रागाची एक्स्प्रेसमध्ये दरवाजाजवळ बसून प्रवास करणार्‍याला चौघांनी मारहाण करीत मोबाइृल व रोकड रक्कम मिळून 11 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना उधना (गुजरात) रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता घडली. याप्रकरणी शेख इद्रिस उमर अली शेख (रा. शहापूर, जैनुबाजार, पश्चिम बंगाल) यांच्या फिर्यादीवरून जळगाव येथे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा सुरत लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवास झाला असुरक्षीत
शेख इद्रिस हे डाऊन पोरबंदर-सांत्रागाची एक्स्प्रेसच्या डी- 1 बोगीतून अहमदाबाद ते सांत्रागाची असा प्रवास करत असताना शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास गाडीत चढलेल्या चौघांनी शेख इद्रिस याला मारहाण करत खिशातील पाकीट काढून घेतले. त्यात 1500 रुपये होते. मोबाईलसह अन्य साहित्य मिळून 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून चालत्या गाडीतून उतरून पळ काढला. सकाळी गाडी जळगाव स्थानकावर आल्यावर शेख इद्रिस यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करून पुढील प्रक्रियेसाठी सुरतला वर्ग करण्यात आला.