पोर्टलद्वारे शोधणार खेळाडू!

0

मुंबई : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे प्रतिभाशाली खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ‘स्पोर्टस टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. तसेच वनवासी भागातील खेळाडूंचे कौशल्य देशापुढे यावे या उद्देशाने आम्ही ‘स्पेशल एरिया गेम्स’ ही योजना सुरू केले असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विद्यमाने 19 व्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांचे चेंबूर येथील आर.सी.एफ. मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडलेश्‍वर प. पू. स्वामी विेश्‍वेश्‍वरानंद गिरी, राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराम उराव, स्वागत समितीचे अध्यक्ष अशोक गोयल उपस्थित होते.

क्रीडांगणे २४ तास उपलब्ध
गोयल पुढे म्हणाले की, केंद्रीय क्रीडा मंत्रालय देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय योजना करत आहे. नवनवीन गोष्टींच्या माध्यमातून खेळाडूंना उत्तमोत्तमसोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच सामान्यातील सामान्य घरातील खेळाडूला देखील दर्जेदार सोयी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळांच्या वाढीसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पोर्टस टॅलेंट सर्च पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये ज्या खेळाडूंकडे खेळांचे कौशल्य असेल, त्याने स्वतःची माहिती आणि आपल्या खेळांतील स्पर्धा, सराव याचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्या खेळाडूला ज्या कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असेल ते, स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. याआधी केवळ श्रीमंत अथवा प्रशिक्षित खेळाडूंसाठी क्रीडांगणाचे दरवाजे उघडले जात असत पण आतामात्र आम्ही कोणत्याही प्रतिभाशाली आणि उदयोन्मुख खेळाडूंना देखील क्रीडांगणे २४ तास उपलब्ध करून दिली आहेत.

स्पेशल एरिया गेम्स योजना
गोयल म्हणाले की, सामन्यातील सामान्य घरातील खेळाडूलादेखील दर्जेदार सोयी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळांच्या वाढीसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘स्पोर्टस टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरु केले आहे. यामध्ये ज्या खेळाडूंकडे खेळांचे कौशल्य असेल, त्याने स्वतःची माहिती आणि आपल्या खेळांतील स्पर्धा, सराव याचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्या खेळाडूला ज्या कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असेल ते, ‘स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. वनवासी भागातील खेळाडूंचे कौशल्य देशापुढे यावे या उद्देशाने आम्ही स्पेशल एरिया गेम्स ही योजना सुरु केली आहे, या योजनेत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने सहभागी व्हावे, आम्ही त्यांना सर्वोपरी मदत करू, असे मनोगत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना परीक्षेत २५ गुण
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात सुरु असलेले वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य मी पहिले आहे. या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून वनवासी भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंना कमी पदके मिळतात, परंतु वनवासी खेळाडूंना योग्य संधी दिली आणि त्यांच्या कौशल्याला जगापुढे आणले तर यातून दर्जेदार ऑलिम्पिक पटू तयार होतील. तसेच महाराष्ट्र सरकारने खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेत २५ गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाले.