मॉस्को । रशीयात खेळल्या जात असलेल्या 21 व्या फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात स्टार फुटबॉलपटु ख्रिस्तीयानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पोर्तुगालने मोरक्कोला हरवत आपल्या विजयाचे खाते खोलले. हा सामना पोर्तुगालने 1-0 असा जिंकला. सामन्यातील पहिल्या हाफमधील 4 थ्या मिनीटालाच रोनाल्डोने केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. या गोलनंतर रोनाल्डोला संघाची आघाडी वाढचण्याच्या अनेक संंधी मिळाल्या पण त्याचा फायदा त्याला उठवता आला नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील रोनाल्डोचा हा चौथा गोल आहे. दुसरीकडे मोरक्कोच्या खेळाडुंनी जोरदार लढत देत सामन्यात बाऊन्सबॅक करण्याचे प्रयत्न केले पण त्यांचे सर्व डावपेच पोर्तुगालच्या बचावफळीने यशस्वी होऊ दिले नाहीत. स्पर्धेतील पहिल्या लढतीत रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालने स्पेनविरुद्धचा सामना 3-3 असा अनिर्णित राखला होता. रोनाल्डोची फुटबॉलमधील ही एकावन्नवी हॅट्ट्रिक होती. विशेष म्हणजे फिफा विश्वचषक स्पर्धेमधीलही एकावन्नावी हॅट्ट्रिक होती. पहिल्या सामन्यातील हॅट्ट्रिकमुळे 4 फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो चौथा फुटबॉलपटू ठरला होता.
2010 मधील फिफा विश्वचषक स्पर्धेत पॉल ऑक्टोपस प्रत्येक सामन्यापूर्वी अन्न ठेवलेल्या दोन पेटयांपैकी एकाची निवड करून सामन्यात कोणता संघ विजयी होणार याची भविष्यवाणी करायचा. त्याचप्रमाणे रशियात सुरू होणार्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी यंदा ऍचिलस नावाची पांढरी मांजर सर्व संघांचे भवितव्य ठरवणार आहे. आता आणखीन एका एका भविष्य जाणणार्या डुकराची भर पडली आहे. त्यामुळे लोकप्रियतेचा कळस गाठणार्या विश्वचषक स्पर्धेच्या दंतकथांमध्ये आणखी एकीची भर पडणार आहे. भविष्य जाणणार्या डुकराने आताच विश्वचषक 2018 मधील उपान्त्य फेरीतील चार संघ सांगून टाकले आहेत. विशेष म्हणजे या डुकराने 2014 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्यदेखील आधीच सांगितले होते. मिस्टिक मार्कस असे या डुकराचे नाव असून ते डुक्कर आठ वर्षांचे आहे. या डुकराने रशिया येथे होत असलेल्या विश्वचषकामध्ये कोणते 4 संघ उपान्त्य फेरीचा पल्ला गाठतील याचे भविष्य वर्तवले आहे. मार्कसच्या पुढ्यात 32 फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर विश्वचषक 2018मध्ये सहभागी झालेल्या 32 देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने 4 फळे निवडून उपान्त्य फेरीत जाणारे संघ सांगितले. मार्कसने अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जियम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे निवडली. त्यामुळे हे चार संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील, अशा मार्कसने व्यक्त केलेल्य अंदाजावर सट्टेबाजी सुरूही झाली आहे.
अन् आग लागली फुटबॉलपटूंच्या विमानाला!
फीफा विश्वचषक स्पर्धेची धूम रशियामध्ये सुरू झाली आहे. सौदी अरेबियाचे खेळाडू त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी विमानाने निघाले होते. अशातच झालेल्या एक अपघाताने खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. रोस्तोव आन दोनकडे येणार्या विमानाच्या इंजिनामध्ये अचानक आग लागली. मात्र, विमान वेळीच सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याने खेळाडू बचावले आहेत. सौदी फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष अहमद अल हर्बी यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रसंगाची माहिती दिली आहे. विमानाच्या इंजिनामध्ये लहान स्वरूपाची आग लागली होती. मात्र यावेळी प्रसंगावधान साधत विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे. या प्रसंगाचा एक व्हिडिओदेखील ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिमध्ये एकाने या प्रसंगावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हांला भीती वाटली का ? असे विचारताच नाही. थोडी भीती वाटत होती पण अल्लाहचे धन्यवाद, असे त्यांनी सांगितले आहे.