जळगाव : सुभाष चौक भागातल्या पोलन पेठतील एका अगरबत्ती दुकाना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी महानगरपालिकेचे तीन अग्शिमशन बंब दाखल झाल्यानंतर कर्मचार्यांनी पाण्याचा मारा करीत एक तासाच्या प्रयत्ननंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे कळते. तर ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. पोलन पेठेत सुरेद्र रोशनलाल नाथाणी यांच्या मालकीचे रोशन अगरबत्ती एजन्सी आहे. तर दुकानाच्यावर डॉ. एम.एस. राव यांचा दवाखाना आहे. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक दुकानाच्या मागील भागातून धूर निघतांना दुकानातील कामगारांना व मालकांना दिसले असता त्यांनी मागील बाजूला जावून पाहिल्यानंतर त्यांना आग लागल्याचे दिसून आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुर पसरले होते.
आग विझविण्यासाठी दुकानातील कामगारासह परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू होती. यातच काहींनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती कळविताच अग्निशमन दल काही मिनीटातच पोलन पेठेत पाचारण झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी लागलीच पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. तर दुसरीकडे दुकानातील कामगार हे दुकानात असलेल्या अगरबत्ती भरलेले पेट्या व बॉक्स बाहेर काढण्याण्यासाठी धावपळ करत होते. काही वेळातच दुसरे अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर दोन्ही बंबाद्वारे दुकानात पाण्यात पाण्याचा मारा करण्यात येत होता. आग व पाण्याचा मारामुळे दुकानातील अगरबत्ती व इतर साहित्यांचे नुकसान झाले.
अखेर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अग्शिमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, आग लागल्याने दुकानाच्या आजू-बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. आग लागल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे चंद्रकांत कोसे, वासुदेव सोनवणे, संजय शैलार, अमोल विसपूते, तर शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी गजानन बडगुजर आदी कर्मचारी देखील दाखल झाले होते
घटनास्थळी पोलिस दाखल
दरम्यान, आगीमुळे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे सुरेंद्र नाथाणी यांच्या म्हणणे होते. तर ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी असा अंदोज परिसरातील नागरिकांकडून व दुकानातील कामगारांकडून वर्तविण्यात येत होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तसेच दीपक अगरबत्ती या दुकानातील साहित्यांचेही किरकोळ नुकसान झाले आहे.