पोलादपुरातील ग्रामपंचायतींची निवडणूक 14 ऑॅक्टोबरला

0

पोलादपूर (शैलेश पालकर) । तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेची तयारी पोलादपूर तहसिल कार्यालयाद्वारे सुरू झाली असताना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडपण ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2018 पर्यंत असल्याने तेथील निवडणूक लांबणीवर पडली आहे. उर्वरित राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात म्हणजे येत्या 14 ऑॅक्टोबरला घेण्यात येणार आहे. पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश झाला.

असा असेल कार्यक्रम
16 ग्रामपंचायतींच्या निवडणूक येत्या 14 ऑॅक्टोबरला घेण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी जाधव यांनी येथे दिली. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येतील. ही नामनिर्देशनपत्रे 5 ऑॅक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑॅक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीसाठी 16 ऑॅक्टोबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती यावेळी तहसीलदार जाधव यांनी दिली.