पोलादपुरात आदित्य ठाकरेंचे रायगड जिल्ह्यात जंगी स्वागत

0

पोलादपूर । रत्नागिरी जिल्ह्यातून महाडच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे पोलादपूर येथे रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावले आणि रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, महिला जिल्हा संघटक वैशाली भूतकर, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पं.स.सदस्य यशवंत कासार, शहरप्रमुख सुरेश पवार, नगराध्यक्षा सुनीता पार्टे, उपनगराध्यक्ष उमेश पवार, बांधकाम सभापती प्रकाश गायकवाड, पाणीपुरवठा सभापती निलेश अहिरे, महिला बालकल्याण सभापती तालुका सिद्दीका लोखंडे व नगरसेविका, तालुका युवा सेना अधिकारी संजय कळंबे, शहर युवासेना अधिकारी ॠषिकेश मोरे, सिध्देश शेठ, सुशांत जगताप, विनायक दीक्षित, महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे तसेच विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि विविध पदाधिकारी यांनी असंख्य शिवसैनिकांसोबत उपस्थित राहून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला भव्य स्वरूप आणले.

यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावले, शहर युवासेना अधिकारी ॠषिकेश मोरे, सुशांत जगताप, विनायक दीक्षित या युवासेना पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या छ. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिक व पदाधिकारी महाड येथील सभास्थळी उपस्थित राहण्यास रवाना झाले. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी चौक या ठिकाणी मतदारांना संबोधित करतेवेळी शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे यापुढे प्रत्येक उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.