पोलादपूरमध्ये रंगला महिलांचा मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात

0

पोलादपूर । शहरातील एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माणगावच्या प्रेरणा गु्रपच्या महिलांचा मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन पोलादपूर येथील दिशा ग्रुपने केले. यावेळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप आणि त्यांच्या पत्नी पुष्पा जगताप यांनी उपस्थित राहून मंडळाला प्रोत्साहन दिले. पोलादपूर शहरातील दिशा ग्रुपच्या अध्यक्षा व गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षा श्रावणी शहा आणि सदस्या सिद्धी मोरे, योगिता भागवत, सोनिया शेठ, उज्ज्वल शेठ, अपर्णा भागवत, स्वाती भागवत, हर्षदा बोरकर, सोना प्रजापती, आदिती नगरकर, मंजुषा साबळे, सारिका पालकर यांनी माणगावच्या प्रेरणा ग्रुपच्या महिलांचा मंगळागौरी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष सहकार्य केले.

पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती
यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल भुवड, कार्याध्यक्ष संतोष चिकणे, उपाध्यक्ष ओमकार मोहिरे व महेश निकम, सचिव सचिन दुदुस्कर, सिद्धेश पवार, शुभम सलागरे व प्रवीण पांडे तसेच खजिनदार रूपेश तलाठी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक राजन पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये नियोजन केले. माणगावच्या प्रेरणा ग्रुपच्या स्नेहल दोसी, सुरेखा दांडेकर, दीक्षा देसाई, सुजाता शेठ, सुविधा मेहता, मंगल बापट, श्‍वेता शेठ, रश्मी शेठ, श्‍वेता देसाई आदी महिलांनी साधी, तवा, बस, सराटा, नमस्ते, दंड, कंबर, नखुल्या, लाटणं, चौफुला, कमळ आदी फुगडयांचे विविध प्रकार, सवत भांडण, कोंबडा, आळुंखी साळुंखी, आगोडा पागोटा, अटुष्य पान बाई नटूष्य, अडगळघूत पडगळघुम, टामटौली कंबरलवली, होडी, ताक, धुणं, पाऊस, लाह्या श्रावण तसेच सैराट पिंगा आणि साधा पिंगा असे विविध मंगळागौरीच्या पारंपरिक नृत्यांतून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली.