पोलिसांकडून दुचाकींवर कारवाई

0

पिंपरी : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेशिस्तपणे दुचाकीस्वारांवर पिंपरी वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. चौकाच्या परिसरात बेशिस्तपणे लावलेल्या त्याचबरोबर वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर शनिवारी (दि. 13) कारवाई करण्यात आली. पिंपरी वाहतूक पोलिसांच्या वतीने केलेल्या या कारवाईत दुचाकींना जॅमर लावण्यात आले होते. दुचाकींवर कारवाई केली; परंतु चौकातील वाहतूक कोंडीत मोठा वाटा असणार्‍या रिक्षांवर पोलिस केव्हा कारवाई करणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे जुन्या मुंबई महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या रिक्षांवर कारवाई केली जाणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या चारही बाजूंना रिक्षाचालकांच्या वावरामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक होण्याचे प्रकार होतात. परंतु पोलिस त्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेतात.