पोलिसांकडून मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासणे सुरू

0

जळगाव । निकालपाहून येते, असे सांगून रविवारी सायंकाळी घरातून बाहेर पडलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मेहरूण तलावात सोमवारी पहाटे मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला आहे? यासंदर्भात पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाइल ताब्यात घेऊन त्यातील कॉल डिटेल्स तपासणे सुरू आहे. तसेच एका तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच त्याचीही कसून चौकशी करण्यात आली.
निकाल पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली तरूणी ऑटोनगरातील गीतावाडी भागात राहणारी मयुरी सुरेशचंद्र पवार (वय 19) ही शहरातील एका तंत्रनिकेत विद्यालयात कॉम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेते होती. ती रविवारी सांयकाळी वाजता दुचाकी (एमएच 19 एएच 0485) घेऊन घरातून बाहेर पडली. निकाल पाहून येते, असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर सोमवारी सकाळी 5.30 वाजता मयुरीचा मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला.

एकाला घेतले ताब्यात
मयुरीही निकाल पाहण्याच्या कारणाने रात्री घराबाहेर पडली होती. रात्री तिची दुचाकी मेहरूण तलाव परिसरात दिसली. तर मोबाइलही डिक्कीत ठेवला होता. हा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यातील कॉल डिटेल्स काढले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर ती कोणाला भेटली?, फोनवरून कोणाशी संवाद साधला?, मेहरूण तलाव परिसरात कशासाठी गेली होती. त्याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी मयुरीच्या मोबाइलमधील शेवटचे तीन कॉल नेमके कोणाचे होेते. त्याची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एसटी कॉलनीतील एका तरूणाला ताब्यात घेतले होते. चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले.