मुंबई : राज्यभरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणार्या पोलिसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. पोलिसांच्या आहारभत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
त्यामुळे आता तब्बल सहा वर्षानंतर पोलिसांचा आहार भत्ता वाढला आहे. पोलिस दलातील कर्मचार्यांना विविध भत्ते देण्यात येतात. सरकारच्या निर्णयानुसार आता पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, छायाचित्रकार यांच्या भत्त्यात महिना 1500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हा आहारभत्ता 840 रुपये होता. तर पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस नाईक यांचा भत्त्यात जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे. महिन्याला 1350 रुपये भत्ता मिळणार असून, याआधी 700 रुपये भत्ता देण्यात येत होता.