जळगाव । जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस मुख्यालयातील प्रेरणा हॉल येथे गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, चाळीसगाव अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा पोलिस अधीक्षकांनी घेतला.
यांचा झाला सन्मान
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम, गोपाळ चौधरी, तुषार विसपुते, हितेश बागुल, ज्ञानेश्वर कोळी, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस अधीक्षक निलोत्पल, सपोनि. आर.टी.धारबळे, जगदीश परदेशी तसेच वरणगाव पोलिस ठाण्याचे सपोनि. संदीप पाटील, कासोदा पोस्टेचे वासुदेव मराठे, चेतन पाटील, गुलाब माळी, चोपडा शहर पोस्टेचे पोलिस निरिक्षक किसन नजन पाटील, एलसीबीचे सपोनि. सागर शिंपी, भुसावळ नियंत्रण कक्ष सपोनि. केलसिंग पावरा, मनोहर देशमुख, सुशिल पाटील, मनोज दुसाने, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, बापुराव भोसले, शशिकांत पाटील, संदीप जगताप, अमळनेर पोस्टचे अशोक पाटील, चोपडा शहर पोलिस ठाण्यातील पोकॉ. देवसिंग मथुरे, रियाजउद्दीन हुसनोद्दीन शेख, लियाकत खान अशरफ खान आदींना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यातच त्यांना पोलिस अधीक्षकांनी मार्गदर्शनही केले.
अधिकार्यांना केल्या सूचना
नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासंदर्भात पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकार्यांना व कर्मचार्यांना सुचना केल्या आहेत. यातच नवरात्रोत्सव व मोहरम हे सण शांततेपर पार पाडण्याकरीता काय उपाययोजना कराव्यात याविषयी देखील त्यांनी अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेत तपासांना गती देण्याच्या सुचना देखील यावेळी त्यांनी दिल्या आहे. बैठकीत सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यानंतर पोलिस अधीक्षकांसह अपर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांनी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. यातच तपासाबाबत पोलिस अधिक्षकांनी अधिकार्यांसह कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.