दौंड । दौड शहरात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी एका दिवसात 5 चोर्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोर्यांवर अंकुश बसविण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी दौंड शहर युवक मराठा महासंघाच्या वतीने अविनाश गाठे, सागर त्रिभुवन यांच्यातर्फे करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे लेखी निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे.