पोलिसांचे कोम्बिंग

0

पिंपरी-चिंचवड । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. शुक्रवारी रात्री परिमंडळ तीनच्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 200 गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

गणेशोत्सव महिनाभरावर आला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडवा आणि शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. परिमंडळ तीनमधील पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी, निगडी, वाकड, सांगवी, हिंजवडी आणि चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.