गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढतच आहे. आता पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली आहे. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन दोन जणांची हत्या केली आहे. हत्या करुन नजीकच्याच गावामध्ये त्यांचे मृतदेह फेकण्यात आले आहे. दोन्ही जण कुरखेडा भागातील रहिवाशी होते.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये अशा प्रकारे हत्या करण्यात येण्याची ही सातवी घटना असल्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधले आहे.