पोलिसांच्या छावणीवर अतिरेकी हल्ला; एका अतिरेक्यांशी ठार करण्यात यश

0

अनंतनाग – येथील पोलिसांच्या छावणीवर शुक्रवारी रात्री अतिरेकी हल्ला झाला. त्यामध्ये १ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याला पोलिसांनी प्रत्युत्तर देत लष्कर-ए-तैय्यबाच्या एका अतिरेक्यास ठार केले आहे.

या अतिरेकी हल्ल्यावरुन सैनिकांनी तपास मोहीम सुरू केलेली आहे. ते अनंतनाग परिसरात अतिरेक्यांचा तपास करत आहेत. ठार झालेल्या अतिरेक्याकडून शस्त्र मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तो लष्कर-ए-तैय्यबाचा अतिरेकी असल्याचे स्पष्ट केले.

हल्ला होताच पोलिसांनी प्रसंगावधान साधून विरुद्ध हल्ला चढवला होता. त्यामुळे तो हल्ला धुळकावून लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र, या हल्ल्यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सूचित केले आहे.