पोलिसांच्या नाकाबंदीत आढळला दुचाकी चोर

0

भुसावळ । बाजारपेठ पोलिसांच्या नाकाबंदीत दुचाकीचोर आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. पवनकुमार पुनामप्रसात मिश्रा (20, नागोत, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवार, 1 रोजी नाकाबंदी केली असता एक जण पोलिसांना पाहताच पसार होत असल्याने त्यास शिताफीने पकडण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, प्रशांत चव्हाण, विकास सातदिवे, होमगार्ड रमेश बीडकर यांनी ही कारवाई केली.