पोलिसांच्या रात्रीच्या सक्तीच्या गस्तीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे : भुसावळ शहरात आरएफआयडी प्रणालीचे उद्घाटन
भुसावळ : कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असून शहरवासीयांना भयमुक्त वातावरणात वावरता आले पाहिजे यासाठी आमचे अधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यापुढे शहरात रात्रीची गस्त सक्तीचे होणार असल्याने शहरातील गैरप्रकारांना निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील संतोषीमाता सभागृहात आरएफआयडी (रेडीओ फ्रिक्वेन्सी अॅडेडीटी) चे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सेामनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक विलास शिंदे, निरीक्षक प्रताप इंगळे आदी उपस्थित हेाते. प्रस्तावना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केली. त्यांनी शहरातील विविध भागात आरएफआयडी लावण्यात आले आहे. या माध्यमातून पोलिसांची रात्रीची गस्त ही सक्त होणार आहे. यामुळे कुठल्या भागात पोलीस कर्मचारी गेले नाही, याची ओरड होणार नाही. त्यामुळे पोलिसांना नेमून दिलेल्या परीसरात पोलीस कर्मचार्यांची गस्त हेाणार आहे. यावेळी सराफ असेाशिएशनचे अध्यक्ष वसंत विसपुते, व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, रोटरी अध्यक्ष संजय भटकर, महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आरती चौधरी, अशोक नागराणी, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
पोलिसांची रात्रीची गस्त होणार सक्तीची
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे म्हणाले की, शहरातील एटीएम, बँका, शासकीय कार्यालय तसेच शहरातील शेवटच्या परीसरापर्यंत एकूण 240 पॉईंटवर आरएफआयडी प्रणाली लावण्यात आली आहे. पूर्वी पोलिसांना रात्र गस्तीदरम्यान वह्यांवर स्वाक्षरी करावी लागत होती ती आता कालबाह्य झाली असून नव्या प्रणालीनुसार गस्त केल्याची हजेरी लावावी लागणार आहे. पोलिसांची या प्रणालीत हजेरी न आढळल्यास त्यांच्यावर प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ.मुंढे म्हणाले. आरएफआयडी प्रणाली शहरातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यान्वीत केली आहे त्यामुळे आता पोलिसांची जबाबदारी आहे, रात्रीच्या वेळी गस्त सक्त झाली पाहिजे.
शहर गुन्हेगारांना कुरण : अपर अधीक्षक
ग्रामीण भागात जास्त चोर्या होत नाही, शहरात अनेाळखी व्यक्ती येत असतात. ग्रामीण भागात केाणी अनेाळखी व्यक्ती दिसल्यास तत्काळ लक्षात येत असते त्यामुळे शहरे ही गुन्हेगारांसाठी कुरण आहे, असे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मनोगतात सांगितले.
मान्यवरांचा गौरव
आरएफआयडी या उपकरणासाठी शहरातील विविध संघटना, सामाजिक संघटनांतर्फे मदत करण्यात आली. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांच्या हस्ते वसंत विसपुते, विनोद बियाणी, राधेश्याम लाहेाटी, संजय भाटकर, आरती चौधरी, अशोक नागराणी, विकास पाचपांडे, ज्ञानचंद लेखवानी, राजाभाऊ काबरा, राजेश पोतदार, राजीव पारिख, अमीत सोमाणी, दिपक सूर्यवंशी आदींचा गौरव करण्यात आला.