तळेगाव दाभाडे । गणेशोत्सवामध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना फिनोलेक्स कंपनीचे प्रमुख प्रकाश छाब्रिया यांचे हस्ते ‘एनर्जी फूडचे’ वाटप करण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनकडून सदर उपक्रम राबविण्यात आला.
तळेगाव दाभाडे येथील गणपतीचे विसर्जन सात दिवसामध्ये होते. त्याला अनुसरून तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनाच्या प्रांगणात उपस्थित सर्व पोलिस कर्मचार्यांना छाब्रिया यांचे हस्ते ‘एनर्जी फूडचे’ वाटप करण्यात आले. यावेळी देहूरोड ग्रामीणचे उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुटराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर, बाजीगरे अबुबकर लांडगे, व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत चोख बंदोबस्त ठेऊन पोलिस समाजाची सेवा करतात. त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून या एनर्जी फूडचे वाटप करण्यात आले, असे छाब्रीया यांनी सांगितले.