पोलिसांना घराजवळच ड्युटी द्यावी; पोलिस मित्र संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

पिंपरी-चिंचवड : लिसांना त्यांच्या निवासस्थानापासून जवळ ड्युटी द्यावी. तब्येत सांभाळून कामावर जाणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष आहे. आपल्या पसंतीने कामाचे ठिकाण निवडण्याची मुभा असताना व तसे आदेश असतानाही कर्मचार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते, असे निवेदन अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्र गिरीष बापट आणि पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना निवेदन दिले आहे.

दोन-तीन तास दूर मिळते ड्युटी
निवेदनात म्हटले आहे, की पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच राज्यातील अनेक शहरात पोलीस कर्मचार्‍यांना त्यांच्या राहत्या जागेपासून कामाच्या नियुक्तीचे ठिकाण खपच लंब असते. चिंचवड, भोसरीमध्ये राहणार्‍याला धनकवडी, पुणे येथे तर हडपसर येथे राहणार्‍याला हिंजवडीमध्ये अशा ड्युट्या दिल्या जातात. सध्या वाढणारी वाहतूक समस्या, वाहतूक कोंडी आदीमुळे कामावर पोहोचण्यास दोन तीन तास लागतात. त्यामुळे घरातून लवकर निघावे लागते. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍याला सगळा वेळ प्रवासामध्ये, नंतर ड्युटीवर जातो. 12 ते 16 तास ड्युटी केल्यानंतर घरी वेळेवर पोहोचण्याची शाश्‍वती नसते.

कर्मचार्‍यांमध्ये असंतोष
या सार्‍याचा कर्मचार्‍यांना अतिशय त्रास होत आहे. घरी म्हातारे आई-वडील, बायका मुले यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो, त्यामुळे मानसिक तणाव, चिडचिड, आरोग्याकडे दुर्लक्ष इ. अनेक कारणांमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा आत्महत्यासारखे पाऊल उचलले जाते, गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना घडल्या आहे. तसेच ज्यांचे वय पन्नाशीच्या पुढे आहे, वयोमानानुसार त्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा अन्य आजार आहेत, अशा कर्मचार्‍यांनाही घरापासून लांब ड्युट्या दिल्या जातात. त्यामुळे त्यांना तब्येत सांभाळून कामावर जाणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष आहे. आपल्या पसंतीने कामाचे ठिकाण निवडण्याची मुभा असताना व तसे आदेश असतानाही कर्मचार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते असे कपोते म्हणाले.