पोलिसांना समाजाच्या सहकार्याची गरज

0

येरवडा । आणीबाणीच्या काळात समाजाकडून पोलिसांना सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी व्यक्त केले.

येरवडा, विश्रांतवाडी पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, संगीता पाटील व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने कोरेगाव भीमा येथे दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर येरवड्यासारख्या संवेदनशील भागात परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने विश्रांतवाडी भागातील आय प्रतिष्ठान, इतर पक्ष व संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.

दरम्यान प्रतिष्ठानचे संस्थापक एस. चव्हाण व कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. राहुल मंडगेल, चाचा खान, जीवन दयाळ, गणेश भिसे, भरत शिर्सेकर, रेवण सूळ, इंद्रजीत कांबळे, महादेव शिंदे, मच्छिन्द्र माने, रवींद्र बधिरके, युनूस सय्यद आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या की, कामाचे तास, दंगली, सण-उत्सवांचा अनेकदा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव येत असतो. मात्र परिसरातील विविध मंडळासह नागरिकांचे सहकार्य मिळत असल्यामुळे कामाचा ताण पडूनही असलेल्या कामाचा उत्साह तुमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांकडून यामुळे काम करण्यास प्रेरणा मिळते.