तालुक्यातील कळगाव येथील घटना; शेतातून वाळू वाहतूकीला विरोध केल्याने वाळूमाफियांची गुंडगिरी
जळगाव – शेतातून वाळू वाहतूक करीत असलेल्या ट्रक घेवून जाण्यास विरोध केल्याने वाळीमाफीयाने कोमल शशीकांत सपकाळे वय 29 या शेतकर्याला बेदम मारहाण ककरीत त्याच्या अंगावर ट्रक चढवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कळगाव येथे घडली. मारहाणीत जखमी सपकाळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यावेळी वाळूमाफियांनी आपण पोलिसांना हप्ते देतो, असा उल्लेख केल्याने पोलिसांच्या आशिर्वादानेच जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे.
वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे शेताचे नुकसान
शेतकरी कोमल सपकाळे यांची कळगाव या गावातील वाघुर नदीच्या काठाजवळ शेती आहे़ वाघूर नदीतून वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळूचा उपसा करतात. वाळू वाहनात भरून सपकाळे यांच्या शेतातून वाहन घेवून जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. वारंवारच्या नुकसानामुळे संतत्प सपकाळे यांनी सोमवारी सकाळी शेतातून जात असलेल्या वाळूचा भरलेला (एमएच़ 39़ सी़ 0411) क्रमांकाचा ट्रक अडविला. व त्यावरील चालकासह व्यक्तींना वाळू वाहतुकीस विरोध केला. तसेच याप्रकाराबाबत तहसीलदार वैशाली हिंग यांनाही फोनवरुन संपर्क साधत माहिती दिली.
अंगावर ट्रक चढवून संपवून टाकू…
वाळूचा ट्रक शेतकर्याने अडविल्याबाबची माहिती ट्रकवरील कामगारांकडून मालकाला मिळाली. त्यानुसार मालकाने घटनास्थळ धाव घेतली. याठिकाणी विरोध करणार्या शेतकरी सपकाळे व मालक यांच्या वाद झाला. वादातून मालकासोबतच्या एकाने शेतकर्यावर धारदार शस्त्राने वार केला. मोबाईलमध्ये प्रकार कैद करण्याचा सपकाळे यांनी प्रयत्न केला असता, मारहाण करणार्यांनी मोबाईल हिसकावून फेकून देण्याचा प्रयत्न केला. सपकाळे जुमानत नसल्याने मालकाने कामगारांना उद्देशून आपण पोलिसांना हप्ते देतो, अंगावर ट्रक चढवून संपवून टाकू सांगितले. व सपकाळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पथकाकडून वाळूचा ट्रक जप्त
सपकाळे यांनी तहसीलदार तसेच पथक येईपर्यंत ट्रकसमोर दुचाकी लावून ट्रक अडवून ठेवला होता. यावेळात ट्रकमालकाने जागेवरच ट्रकमधील वाळू खाली केली. व कामगारांसोबत पसार झाला. यानंतर आलेल्या तहसीलदारांसह पोलिसांच्या पथकाने वाळूचा ट्रक जप्त केला आहे़ मारहाणीत जखमी सपकाळे यांनी झाल्याप्रकाराबाबत तक्रारीसाठी नशिराबाद पोलीस ठाणे गाठले. हाताला ईजा झाल्यामुळे आधी उपचार घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला़ यानंतर उपचारासाठी सपकाळे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. याबाबत नशिराबाद पोलिसांनी उशीरापर्यंत कारवाई सुरु होती.