रॅली ठरली लक्षवेधी : पोलिस मित्र संघटनेचा उपक्रम
पुणे : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नगर येथे फिनोलेक्स इंडस्ट्रिज, गल्फ ऑईल लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी फिल्डवर काम करणार्या 500 पोलिस कर्मचार्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आलेहोते. पोलिस मुख्यालयाच्या मैदानात मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या उपक्रमानिमित्त सकाळी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पोलिस मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेली पोलिसांची मोटारसायकल रॅली लक्षवेधी ठरली.
जिल्हा पोलिस अघिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शर्मा यांच्यासह पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते 500 पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी शर्मा व कपोते यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला फिनोलेक्सचे बी. आर. मेहता, गल्फचे विनायक जोशी तसेच पोलीस सहअधिक्षक अक्षय शिंदे, मनीष कल्वानिया, उपाधिक्षक अरुण जगताप, सुमीत दरंदले, संभव काठेड, शारदा होशिंग, अविनाश मोरे, दशरथ हटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.