पोलिसांनी भंगार बाजारातून 21 वाहने केली जप्त

0

जळगाव। अजिंठा चौक व परिसरातील भंगार बाजारात गुरुवारी पोलिसांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविल्याने अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. या बाजारात जिल्हा तसेच बाहेरगावावरुन चोरुन आणलेल्या ट्रक, कार यासह अन्य वाहनांची विल्हेवाट लावली जात असल्याच्या संशयावरून अचानक भंगार तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात संशयितरित्या भंगार बाजारातून 13 दुचाकी, आटो नगरातून 6 ट्रक आणि 2 ट्रॅव्हल्स असे एकूण 21 वाहने ताब्यात घेतली आहे. त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर ते जर योग्य असतील तर सोडण्यात येतील. मात्र त्यांचे कागदपत्रे मिळाली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नाहीतर कारवाई होणार….
पोलिसांच्या पथकांनी अजिंठा चौफुली तसेच आटो नगरातील भंगारची सर्व दुकाने तपासली. भंगारच्या गोदांमामध्ये ठेवलेले इंजिन, चेचीस तसेच इतर साहित्य तपासून त्यांचे क्रमांकही बघितले. ज्या इंजिन, चेचीसचे क्रमांक नव्हते त्यांचे स्पष्टीकरण पोलिसांनी मागितले आहे. जर दुकान मालकाला ते स्पष्टीकरण देता आले नाही. तर त्यांच्यावर कारवाई होवून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

एकाच वेळी सर्व दुकानांची तपासणी
अंजिठा चौफुलीजवळील भंगार बाजार तसेच ऑटोनगरातील भंगार बाजारात गुरूवारी सकाळी पोलिसांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन सुरू केल्याने गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या भंगार बाजार आणि आटोनगरातील भंगार बाजारात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. अचानक आलेल्या पोलिसांच्या फौज फाट्यामुळे अनेकांची भंबेरी उडली. एकाच वेळी सर्व दुकानांची तपासणी सुरू झाली. भंगार बाजारात गुरूवारी एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन केले. या कारवाईत एमआयडीसी पोलिसांच्या पथकासह, रामानंदनगर, शहर आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच आरसीपी प्लाटून, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी फोर्स यांची मदत घेतली.

कारवाईची माहिती मिळताच धावपळ
कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाल्याने काहीजणांनी त्यांच्या दुकानांना कुलूप लावून ते पसार झाले. दुकानांचे शटर बंद असल्याचे बघून सांगळे यांनी दुकान मालकांना बोलावून दुकाने उघडण्यास सांगितले. दुकान उघडत नसतील, तर पंचाच्या समक्ष दुकानाजाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे घाबरून अनेकांनी दुकाने उघडली.