शहादा । अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासह विविविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार वनविभागाच्या शहाद्यातील वनसरक्ष व वनपाल यांच्यातर्फे नायब तहसीलदारांना सामूहिक निवेदन देण्यात आले. पोलिसांप्रमाणे काही भत्ते मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
काम बंद करण्याचा इशारा
निवेदनावर वनपाल व्ही.टी.पदभोर, वनरक्षक ममता पाटील, वनरक्षक आर, ए, निकम, वनपाल डि.बी. जगदाळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र वन संहितेप्रमाणे निश्चित केलेल्या कामाव्यतिरिक्त इतर लादलेले कामे व पीडीए मोबाईची कामे व जीपीएस यंत्रांची कामे करण्यास बंद करू, असा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे.
या आहेत मागण्या
वनरक्षक-वनपाल यांच्या अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करावी, पोलिसांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळावा, वनपालांना कायम प्रवास भत्ता वाढून मिळावा, वन्यजिव विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना विशेष भत्ता मिळावा, वररक्षकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास पोलिसांप्रमाणचे नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळावी, संप काळातील 11 दिवसांची रजा मंजूर करून वेतन मिळावे, पोलिसांप्रमाणे कुटुंब आरोग्य भत्ता मिळावा, तसेच अतिकालीक व आहार भत्ता मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.